लालपरीला पाहताच ‘त्या’ रडल्या

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, सांगलीत ३०० एसटी कर्मचारी मंगळवारी कामावर पुन्हा रूजू झाले आहेत.
सांगलीत ३०० संपकारी एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. हा प्रसंग मोठा भावुक होता. या कर्मचाऱ्यांपैकी काही महिला कर्मचाऱ्यांना लालपरीला पाहून रडणं आवरलं नाही. त्यांनी चक्क लालपरीला मिठी मारली तेव्हा त्यांन रडू आले.
एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरी रस्त्यावर धावत नाही आहे. राज्यात अनेक ठिकाणी एसटी बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना प्रवास करण्यासाठी इतर खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. तसेच हे वाहनचालक प्रवाशांकडून कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जास्तीचे पैसे आकारत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खीशाला कात्री लागत आहे. तसेच जोवर विलिनीकरण होत नाही, तोवर एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
दरम्यान, सांगलीत संपकारी ३०० कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे सांगलीमधील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच कामावर पुन्हा रुजू झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना रडू आवरलं नाही.