Sun. Oct 24th, 2021

सांगलीत ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

सांगली येथील हरिपूर रोड काळी वाट येथे एका ट्रकने सहा वर्षाच्या चिमुकलीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांनी ट्रकच्या क्लिनरला बेदम मारहाण केली असून ट्रकचा चालक फरार झाल्याचे समजते आहे.  शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं ?

हरिपूर रोड काळी वाट येथे शनिवारी रात्री ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात सहा वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समजते आहे.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या अपघातामुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी ट्रकच्या क्लिनरला बेदम मारहाण केली आहे.

तर या ट्रकचा चालक फरार झाला आहे.

चिमुकली आपल्या काकांच्या दुचाकीवरून घरी जात असताना एका भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकले.

यामुळे चिमुकली दुचाकीवरून रस्त्यावर पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

तसेच संत्पत नागरकांनी केलेल्या मारहाणीत क्लिनरचाही मृत्यू झाल्याचे समजते आहे.

या अपघातामुळे हरिपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सांगली पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *