Mon. Aug 19th, 2019

पूरग्रस्तांचे बचावकार्य सुरूच; सांगलीकरांचा एनडीआरएफच्या पथकाला सलाम!

0Shares

राज्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली. पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी बचावकार्य अजूनही सुरू असून सांगलीकरांनी एनडीआरएफच्या पथकाचे आभार मानले आहे. स्थानिक पोलीस, आर्मी आणि एनडीआरएफचे पथक तत्पर असून नागरिकांना स्थलांतर करण्यात अथक प्रयत्न करत आहेत.

सांगलीकरांचा एनडीआरएफला सलाम –

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे.

पूरस्थिती असल्यामुळे नागरिकांना राहत्या घरातून सुरक्षित जागेवर स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे.

गेल्या सात दिवसांपासून पुराच्या पाण्यातून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

स्थानिक पोलीस, आर्मी आणि एनडीआरएफचे पथक नागरिकांना स्थलांतर करण्यात मदत करत आहे.

तसेच खाण्यासाठी तसेच पिण्यासाठी पाणी आणि फूड पॅकेट पोहोचविण्याचे कामही पथक करत आहेत.

एनडीआरएफच्या पथकाने जिवावर उदार होऊन पुराच्या पाण्यात अडकलेल्या पूरग्रस्तांना बाहेर काढले आहे.

सोशल मीडियावर एनडीआरएफचे पथक मदत करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

बोटीतून खाली उतरत असताना एक महिला एनडीआरएफच्या पथकाचे पाया पडताना दिसत आहे.

तसेच एक वृद्ध महिलेला हातात घेऊन जात असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर दिसत आहे.

यासाठीच सांगलीकरांनी जीव वाचवल्यामुळे आर्मीसह एनडीआरएफच्या पथकाचे आभार मानले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *