Sun. Aug 18th, 2019

सॅनिटरी पॅडमधून ड्रग्जची तस्करी करणारे गजाआड

0Shares

कर्नाटकची राजधानी बंगळूरू मध्ये एका महिलेने चक्क सॅनिटरी पॅडमधून ड्रग्जची तस्करी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तस्करी करणाऱ्या महिलेसह तीन जणांना केंपगौवडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. महिला बंगळूरूवरून दोहाला जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली.

सॅनिटरी पॅड मध्ये सापडले ड्रग्ज 

पोलिसांना केंपगौवडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून  ड्रग्ज तस्करी होणार असल्याची टीप आठवड्याभरापूर्वीच मिळाली होती.

टीपनुसार सापळा रचत विमानतळाच्या पार्किंग लॅाट मधून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे

अटक केल्यापैकी दोघांची नावे अबू आणि मोहम्मद असून दोघेही 20 वर्षाचे आहेत.

त्याचबरोबर ते केरळचे रहिवासी आहेत.

सॅनिटरी पॅडमधून ड्रग्ज बंगळूरूवरून दोहाला तस्करी होत असल्याचे समजते.

जप्त करण्यात आलेले ड्रग्ज ३ कोटी रूपये किंमतीचे आहे.

महिलेकडे असणाऱ्या ड्रग्ज मध्ये ५१० ग्राम मेथाम्फेटामिन आणि ५७२ लिरीका कॅप्सूल सापडले आहेत.

हा तस्करी करणारा ग्रुप बंगळूरू येथून भारत-कतार असा ड्रग्ज स्मगलिंग रॅकेट चालवत होता.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *