Jaimaharashtra news

संजय दत्त निर्मित ‘बाबा’ चित्रपटाचे टीझर रिलिज

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त मराठी चित्रपट घेऊन मराठी सिनेसृष्टीत पर्दापण करणार आहे. संजय दत्त आणि त्यांची पत्नी मान्यता दत्त निर्मित लवकरच बाबा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच चित्रपटाचा पहिला टीझर रिलिज करण्यात आला आहे. संजय दत्त यांचा मराठी सिनेसृष्टीत पहिला चित्रपट असल्यामुळे सध्या चर्चा या चित्रपटाची रंगली आहे.

‘बाबा’ चित्रपटाची चर्चा –

संजय दत्त निर्मित पहिला मराठी चित्रपट ‘बाबा’च्या पहिल्या टीझरचे रिलिज झाले आहे.

‘भावनेला भाषा नसते’ हा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देणार आहे.

संजय दत्त प्रॉडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सनिर्मित ‘बाबा’ हा २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘बाबा’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरला रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

संजय दत्त यांनी या चित्रपटाची माहिती आपल्या ट्विटरवरूनही शेअर केली आहे.

एक कुटुंब सर्व आव्हानांवर मात करत एकत्र राहण्यासाठी कशी धडपड करत असते असा सुंदर संदेश या बाबा चित्रपटाद्वारे देण्यात येणार आहे.

Exit mobile version