Wed. Jun 19th, 2019

संजय दत्त विरोधात अजामीनपात्र वॉरंट

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

संजय दत्तला पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता आहे. संजय दत्तच्या विरोधात एका 15 वर्षे जुन्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

 

शकील नुराणी यांना धमकी दिल्या प्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले. मुंबईत अंधेरीतील महानगर दंडाधिकाऱ्यांनी हे वॉरंट जारी केले. कोर्टानं याआधीही संजय दत्तच्या विरोधात समन्स जारी केले होते.

 

2002 साली शकील नुराणी यांनी संजय दत्तला चित्रपट जान की बाजीसाठी 50 लाख रुपये देऊन साईन केले होते. पण संजय दत्तने अर्ध्यातच चित्रपट सोडला. त्यामुळे नुराणींना 5 कोटींचे नुकसान झाले. शकील यांनी जेव्हा संजय दत्तशी

याबाबत संपर्क केला त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असा आरोप आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: