Fri. Jun 21st, 2019

संजय निरुपम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार – मुनगंटीवार

0Shares

सुधीर मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. असे गंभीर आरोप संजय निरुपम यांनी सुधीर मुनगंटीवारांवर केले होते. अवनी वाघीण हत्या प्रकरणी मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून हटवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. तसेच मुनगंटीवार हे आंतरराष्ट्रीय शिकारी माफियासोबत आहेत, त्याच्यासोबत ते पैसे कमवत आहेत, असा गंभीर आरोपही निरुपम यांनी केला होता.

यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाहीत. निरुपम यांनी सत्याचा निर्घृण खून केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. अवनी वाघिणीच्या मृत्यूबाबत निरुपम यांनी मुनगंटीवार यांच्यावर केलेले गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले आहेत.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: