Wed. May 19th, 2021

संजय निरुपम यांची मिलिंद देवरा यांना ट्विटरवरून शुभेच्छा

 

मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना कॉंग्रेसने उत्तर पश्चिम येथून उमेदवारी दिल्यामुळे निरुपम यांना अध्यक्षपद सोडावे लागले आहे. त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांना मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संजय निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून मिलिंद देवरा यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. संजय निरुपम अध्यक्षपदी असताना काही मुंबई कॉंग्रेसमधल्या नेत्यांचा विरोध होता.

कोण आहेत मिलिंद देवरा ?

मिलिंद देवरा यांची मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

मिलिंद देवरा हे दिवगंत कॉंग्रेस नेते मुरली देवरा यांचा मुलगा आहे.

दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा निवडून आले.

उमेदवारी मिळाली, पण पद गमावलं!

संजय निरूपम यांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली आहे.

2014 साली निरूपम सुमारे साडे 4 लाख मतांनी पराभूत झाले होते.

भाजपच्या गोपाळी शेट्टींनी निरूपम यांचा त्यावेळी पराभव केला होता.

यावेळी मात्र निरूपम दिवंगत गुरुदास कामत यांच्या मतदारसंघातून उभे राहत आहेत.

निरुपम यांची लढत शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांच्याशी होणार आहे.

संजय निरूपम यांच्याविषयी अनेक तक्रारी यापूर्वी काँग्रेस हायकमांडकडे करण्यात आल्या होत्या.

मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.

निवडणुकीपूर्वी मात्र त्यांना उमेदवारी तर मिळाली, पण पद सोडावं लागलं.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *