Mon. Aug 15th, 2022

‘हल्ल्यामागे संजय राऊत’ – प्रवीण दरेकर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ल्यामागे शिवसेना खासदार संजय राऊत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. संजय राऊतांवर होत असलेया आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी राऊतांनी हा हल्ला घडवून आणला असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. या हल्ल्यामागे संजय राऊत यांचा हात असल्याचा दावा दरेकरांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दरेकरांनी केली आहे. प्रवीण दरेकर यांनी राऊतांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर घराच्या परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँक प्रकरणी पोलिसांनी पुन्हा नोटीस बजावली आहे. तसेच ११ एप्रिल रोजी दरेकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत. प्रवीण दरेकर मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदी निवडणूक लढवून २० वर्षे सरकारीच फसवणूक केली असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.