राऊत-खडसेंचा फोन टॅप : सूत्र

शिवसेना खासदार यांचा फोन ६० दिवस टॅप केला होता. तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन ६७ दिवस टॅप केला असल्याची माहिती, सूत्रांकडून मिळाली आहे.
राजकीय नेत्यांच्या अवैध फोन टॅपिंग प्रकरणात ही माहिती समोर आली असून राज्यात मविआ सरकार स्थापन होण्यापूर्वी या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची नावे फोन टॅपिंग करण्याच्या विनंतीमध्ये देण्यात आली आहेत. विनंती करणाऱ्याचे नाव कळू नये म्हणून चुकीच्या नावावरून विनंती केल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दहाहून अधिकांचे जबाब नोंदवण्यात आले आहे.