‘रस्ते वेगळे मात्र मैत्री कायम’ – संजय राऊत

‘देवेंद्र फडणवीस जसं म्हणतात शिवसेनेसोबत आमची दुश्मनी नाही, मी देखील अनेक दिवसांपासून हेच म्हणत आहे’ असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
‘आम्ही काय भारत- पाकिस्तान थोडीच आहोत. भेटीगाठी होत असतात बातचीत होत असते. परंतु राजकीय दृष्ट्या आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. रस्ते वेगळे आहेत मात्र मैत्री कायम आहे. आमची मैत्री कायम राहील’ असं देखील राऊत यांनी सांगितलं आहे. ‘मात्र याचा अर्थ हा नाही की आम्ही सरकार बनवण्यासाठी जात आहोत. परिस्थिती आत्ता काय आहे आणि उद्या काय असेल याचं भविष्य कोणीच सांगू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. दरम्यान, भागवतांच्या भूमिकेचं स्वागत करीत असल्याचंही ते म्हणाले आहे.