भाजप मेहबुबा मुफ्तीला अयोध्येला नेणार होते का?- संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 7 मार्च रोजी होणाऱ्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. सरकारला 100 दिवस झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती आपण दिली होती. त्यानुसार 7 मार्च रोजी मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर जातील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. अयोध्येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामलल्लाचं दर्शन घेतील आणि शरयू नदीवर आरतीही करतील असं राऊत यांनी सांगितलं. त्याचवेळी आमच्यासाठी हा श्रद्धेचा विषय आहे. कुणीही त्याला राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये, असंही बजावलं.

राहुल गांधी यांनाही अयोध्येला घेऊन जाणार का? असा सवाल केल्यावर राऊत ‘भाजप जम्मू-काश्मीरच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्की यांना अयोध्येत घेऊन जाणार होते का?’ असा सवाल राऊत यांनी केला.

सुप्रीम कोर्टाने राममंदिरासंदर्भात निकाल दिल्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी तसंच शरद पवार या सर्वांनी निर्णयाचं स्वागत केलं होतं. हे भाजपच्या नजरेतून सुटलेलं दिसतंय, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Exit mobile version