Tue. Jun 28th, 2022

‘घरचे दरवाजे उघडे आहेत’ – राऊत

एकनाथ शिंदे  यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एक सूचक ट्विट केलं आहे.

संजय राऊतांचे सूचक ट्विट

“चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय ? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!”, असे संजय राऊतांनी ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी शिवसैनिकांना परत येण्याचे आव्हान केले आहे.

संजय राऊतांची मुंबईतील पत्रकार परिषद

शिवसेनेनं मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर 24 तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं थेट आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंना केलंय. संजय राऊत पुढं म्हणाले, बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करु नये, असा सल्ला वजा इशाराही त्यांनी आमदारांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.