Wed. Dec 1st, 2021

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी प्रस्थान सोहळा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी प्रस्थान सोहळा मर्यादित म्हणजेच १०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार असून . प्रस्थानानंतर दर्शनासाठी ३५० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे . मात्र त्यातील जवळपास ३७ वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे . कोरोनाचे हे संकट असताना उत्साह कायम दिसुन येत आहे. संत ज्ञानेश्वर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे .
माऊलींची यंदा पायीवारी नसल्याने लाखो भाविक भक्तांनी विठुरायाला साद घातली.कोरोनाचे संकट दूर होऊ दे,दरवर्षी प्रमाणे पालखी सोहळ्याचा आनंद वारकऱ्यांना मिळणार नसल्याने दुःखी स्वरात साकडे घालणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *