Sun. Oct 17th, 2021

सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी । ।

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळयाला आजपासून सुरुवात होत आहे. यावर्षीचा हा ३३६ वा पालखी सोहळा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळयास सुरुवात होणार आहे.पहाटे पासून मंदिरात काकड आरती आणि महापूजेने सुरुवात झाली. पहाटे ४. ३० वाजल्यापासून मंदीरात विविध कार्यक्रमाने सुरुवात झाली.

दरवर्षी लाखो वारकऱ्यांची मांदियाळी देहू नगरीत पाहायला मिळते मात्र या वर्षी इंद्रायणी नदीचा काठ वारकऱ्याविना सुना दिसतोय.वारकऱ्यांची दिवाळी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर येथील आषाढी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे ११.३० वाजता प्रस्थान होणार आहे,सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे निर्बंधांचे पालन करत अतिशय सामान्य पद्धतीने ,कुठलीही गर्दी न करता श्री संत एकनाथ महाराजांची पालखी प्रस्थान करणार असून अठरा दिवस ही पालखी नाथ मंदिरात मुक्कामी राहणार आहे, वारकऱ्यांच्या चालत आलेल्या परंपरेला यावर्षी थोडा विसावा म्हणावा लागणार असून एसटीच्या माध्यमातून मात्र पंढरपूर येथील सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री संत एकनाथ महाराजांची पालखी प्रस्थान करणार आहे

दरवर्षी अनेक वारकरी काही कारणास्तव वारीला मुकतात. अशा लोकांसाठी गेली ११ वर्ष स्वप्नील मोरे फेसबुक दिंडी करत असतात. दरवर्षी फेसबुक दिंडीची वेगळी थीम असते. यावर्षी दिंडीची थीम ‘आधार फेसबुक दिंडी’ असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *