Wed. Oct 5th, 2022

संतोष बांगर यांचं मुंबईत शक्तिप्रदर्शन

हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी आज मुंबईत येऊन शक्तिप्रदर्शन देखील केले.आमदार संतोष बांगर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली. त्यावर त्यांनी आज मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्याचे आव्हान दिले हाेते. त्यानुसार आज सकाळी ते लोणावळा परिसरात पोहचले. मात्र लोणावळ्यासह मावळ परिसरातील अनेक शिवसैनिकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना आमदार संतोष बांगर सोमवारी मुंबईला रवाना झाले होते, त्यांचे समर्थकही आता एकनाथ शिंदे गटात सामील होणार असून मंगळवारी ते मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार आहेत, अशी माहिती बांगर यांनी दिली होती. आमदार बांगर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या समर्थकांत नाराजी पसरली आहे.

संतोष बांगर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री वर जाऊन भेट घेतली, संतोष बांगर यांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन पहिला मिळाले असून सहयाद्री बाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.संतोष बांगर शेकडो कारकर्त्यांना घेऊन मुंबई ला रवाना झाले होते. संतोष बांगर यांच्या कडून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला आहे, मुख्यमंत्र्यांचा सहयाद्री अतिथीगृहावर सत्कार करण्यात आला . हिंगोली ते मुंबई पर्यंत संतोष बांगर यांचे शक्तिप्रदर्शन , मात्र हिंगोली जिल्हातील सामान्य शिवसैनिकांचा ठाकरेंना पाठिंबा . हिंगोली जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिक हे शिवसेनेला पाठिंबा देतील असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा घोषित केला आहे.आमदार कुठेही गेले तरी कार्यकर्ते हे शिवसेनेसोबतच आहेत असे या शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.