Wed. Dec 1st, 2021

सपना चौधरी अखेर भाजपात; दिल्लीत केला प्रवेश

बिग बॉस 11ची स्पर्धक आणि हरयाणाची सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीने भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकापूर्वी सपना चौधरीने राजकारणात प्रवेश केल्याचे चर्चा सुरू होत्या. मात्र मी राजकारणात प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र आज दिल्लीत जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये सदस्य नोंदणी मोहीम सुरू असून सपना चौधरीने नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याचे समोर आले आहे.

सपना अखेर भाजपात –

हरयाणवी डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीने भाजपात प्रवेश केला आहे.

दिल्ली येथील भाजपाच्या कार्यक्रमात नेत्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे.

भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान, मनोज तिवारी, हर्षवर्धन सिंह यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकापूर्वी सपना चौधरी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे चर्चा सुरू होत्या.

तसेच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही म्हटलं जात होतं.

मात्र सपनाने कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *