Mon. Dec 9th, 2019

… आणि चक्क सरफराजने दिली जांभई

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला असून भारतात आनंदाचे वातावरण पसरले आहे. भारत आणि पाकिस्तानचा हा महामुकाबला बघण्यासाठी अनेकांनी इंग्लंडच्या मॅंचेस्टरमधील मैदानावर प्रचंड गर्दी केली होती. भारत- पाकच्या सामन्यासाठी अनेक जण प्रचंड उत्सुक होते. प्रेषकांसह दोन्ही संघामध्येही तेवढीच उत्सुकता बघायला मिळाली. मात्र पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद जांभई देताना दिसून आला.

नेमकं काय घडलं ?

भारत- पाकमध्ये झालेल्या महामुकाबल्यात पाकिस्तानचा दारूण पराभव झाला आहे.

भारताने 336 धावांचे आव्हान पाकिस्तानला दिले.

हा सामना इंग्लंडच्या मॅंचेस्टरमधील मैदानावर हा सामना रंगला.

मोठ्या संख्येने चाहत्यांनी हा सामना बघण्यासाठी हजेरी लावली होती.

मात्र पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने चक्क क्षेत्ररक्षक करताना जांभई देत असल्याचे बघायला मिळाले.

सरफराजने जांभई दिल्यामुळे तो सामना खेळण्यासाठी किती उत्सुक असल्याचे दिसते असे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

नेटीझन्सने सोशल मीडियावर मीम बनवून ट्रोल करत असल्याचे म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *