Thu. Jul 2nd, 2020

लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?

562 संस्थानांंचे विलीनीकरण करणारे भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल आज 68 वी पुण्यतीथी. गुजरातमधील खेडा जिल्हात 31 ऑक्टोबर 1875 साली त्यांचा जन्म झाला. भारताचे एकीकरण आणि कुटनीतीसाठी त्यांची ओळख आहे. कारण देशाचे एकीकरण करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा उल्लेखनीय आहे.
22 व्या वर्षी 10 वी पास झालेला विद्यार्थी-
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना आपले शिक्षण पुर्ण करण्यास बराच कलावधी लागला, 22 व्या वर्षी त्यांनी आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर कॉलेजचे शिक्षण पुर्ण करण्यापेक्षा त्यांनी पुस्तकं आणून स्वता जिल्हाधिकारी पदाच्या परिक्षेची तयारी केली, येवढेच नाही तर या परिक्षेत ते चांगल्या मॉर्कने पास देखील झाले.
36 व्या वर्षी वकीलीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना इंग्लडला पाठवले. कधीही कॉलेजला न गेलेले वल्लभभाई 36 महिन्यांचा वकीलीचा कोर्स 30 महिन्यातच यशस्वीरित्या करुन 1913 मध्ये भारतात परतले. त्यांनंतर त्यांनी अहमदाबादमधून वकिली सुरु केली.
sardar_4.jpg
जेव्हा पत्नीच्या निधनाची माहिती मिळाली-
जेव्हा पत्नी झावेर बा यांच्या निधनाची माहिती मिळाली तेव्हा सरदार पटेल न्यायालयातील एका केसच्या सुनावणीमध्ये व्यस्त होते, कोर्टात केस संबंधित दावे प्रतिदावे करण्यात येत होते आणि अचानक एक व्यक्ती त्यांच्या हातात झावेर बा यांच्या निधनाची महिती देणारी एक चिठ्ठी देऊन गेला. ती चिठ्ठी वाचून शांतपणे त्यांनी आपल्या कोटच्या खिशात ठेवली आणि न्यायालायाची सुनावणी चालू ठेवली, एवढंच नाही तर त्यांनी ती केस जिंकली देखील. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या निधनाची बातमी उपस्थितांना सांगितली.
झावेर बा कॅंसरमुळे बराच काळ त्रस्त होत्या, मुंबईतील हॉस्पिटलमधील ऑपरेशन वेळी त्यांचे निधन झाले.
सरदार पटेल आणि संस्थानांचे विलीनीकरण-
हैद्राबाद, जुनागड यांसारख्या संस्थानांच स्वातंत्र भारतात विलीनीकरण करण्याचे जिकरीचे काम होते. परंतु आपल्या राजनैतिक आणि कुटनीतीच्या जोरावर सरदार पटेल यांनी या संस्थानांना विलीन करुन घेतले.
भारताकडून करण्यात आलेल्या पोलीस अॅक्शन नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करुन घेण्यात आले. तर जुनागड संस्थानकाच्या नवाबाला स्वातंत्र्यानंतर जुनागड पाकिस्तानात विलीन करायचे होते, परंतु तेथील बहुसंख्य जनता ही हिंदु असल्याने जनतेने पाकिस्तानात सहभागी होण्यात नकार दिला. त्यानंतर भारत सरकारकडून पोलीस करवाई करत जुनागड भारतात विलीन करुन घेतले.
sardar_5.jpg
गांधीचा आदर करणारे सरदार पटेल-
स्वतंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानामुळे लोक सरदारांना पंतप्रधान पदी पाहू इच्छित होते, परंतु इंग्रजांचे राजकारण आणि महात्मा गांधींची जवाहरलाल नेहरु यांना पंतप्रधान पदी बसवण्याच्या इच्छेमुळे त्यांनी कधीही ब्र काढला नाही,परंतु त्यांनी कायम महात्मा गांधींचा आदर केला. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. त्यानंतर ते भारताचे पहिले उपपंतप्रधान बनले.
sardar_2.jpg
सरदार वल्लभभाई पटेल यांचा कार्यकाळ-
1916 साली त्यांनी लखनऊमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात गुजरातचे प्रतिनिधित्व केेले होते.
1917 साली ते तेथील नगरपालिकेवर निवडूण गेले.
गांधींच्या विचाराने प्रेरित झाल्याने काही काळाने ते स्वतंत्र चळवळीशी जोडले गेले.
1917 साली त्यांनी खेडा सत्याग्रहात साराबंदी विरोधात आंदोलन केले,  बारडोली सत्याग्रहात आपल्या योगदानानंतर वल्लभभाई प्रकाश जोतात आले. वकिल असलेल्या पटेलांनी नंतर स्वातंत्र आंदोलनात स्वताला झोकवून घेतले.
1920 साली असहकार आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर वल्लभभाई यांनी आपली वकिलीची नोकरी सोडून देत आंदोलनात सहभागी झाले.
1931 साली ते कराची येथील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले.
1942 साली ते भारत छोडोच्या आंदोलनात सहभागी झाले.
1946 साली स्थापन झालेल्या मध्यवर्ती मंत्रिमंडळात त्यांनी गृहमंत्रीपद भूषवले. त्याबरोबरच ते घटना समितिचे सदस्य देखील होते.
1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते भारताचे उपपंतप्रधान झाले. त्याबरोबरच गृहमंत्री, माहिती प्रसारण मंत्री अशी जबाबदारीची खाती देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
हैद्राबाद, जुनागड यांसारख्या संस्थान स्वातंत्र भारतात विलीन केले.
15 ऑक्टोबर 1950 साली या लोहपुरुषाने मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *