Jaimaharashtra news

11 तास ‘तो’ चिमुरडा मृत्यूशी झुंज देत होता पण…

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

साताऱ्यात बोअरवेलमध्ये पडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

आपत्कालीन विभागाकडून मंगेश या 6 वर्षांच्या मुलाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

 

पण, 11 तासांच्या या प्रयत्नांना अपयश आले. माण तालुक्यातल्या विरळी गावातली ही दुर्दैवी घटना आहे.

 

मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. तो 10 फुटांवर अडकल्याचा प्राथमिक अंदाज होता.

 

पण, जेसीबीनं खोदकाम केल्यावर त्या हादऱ्यानं मंगेश 17 फुटांवर गेला. त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण रात्री 2 वाजता मंगशेचा मृतदेहच हाती

लागला.

Exit mobile version