Sun. Sep 19th, 2021

दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद

जम्मू काश्मिरातील नौशेरात झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचा पुत्र शहीद झाला आहे. मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत यांना चकमकीत वीरमरण आले आहे.

शहीद संदीप सावंत हे मूळचे साताऱ्यातील कराड तालुक्यातील मुंडे गावातील रहिवाशी होते. ते 25 वर्षांते होते. त्यांच्या पश्चात पत्नी सविता आहेत.

वीरपुत्र शहीद झाल्याने मुंडे गावात शोककळा पसरली आहे. पूर्ण गाव दु:खासह शोकात बुडालं आहे.

नववर्षाच्या सकाळी संदीप सावंत यांना नियंत्रण रेषवर संशयीत हालचाली दिसल्या.

यामुळे त्यांच्यासह असलेल्या इतर सहकाऱ्यांनी तात्काळ सज्ज झाले.

यादरम्यान दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे दिसले. पण सकाळची वेळ असल्याने धुकं होते.

यामुळे नक्की किती दहशतवादी होते, हे समजू शकले नाही.

यामुळे संदीप सावंत यांनी पुढे जात हल्ला केला. यावेळेस गोळीबार करण्यात आला.

या गोळीबारात संदीप सावंत आणि नेपाळच्या गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा मगर जखमी झाले. यात त्या दोघांना वीरमरण आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *