Mon. May 10th, 2021

वाईमधील भाजपच्या नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदेंना ठेकेदाराकडून 14 हजाराची लाच घेताना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

वाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना लाच घेतना अटक करण्यात आली आहे.  ठेकेदाराकडून लाच घेताना नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे यांना अटक झाली.

 

शिंदे यांच्यासह त्यांच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे. प्रतिभा शिंदे या भाजपकडून निवडून आल्या आहेत.

 

यंदा नागरिकांमधून नगराध्यक्षांची निवड झाली आहे. मात्र, लोकनियुक्त नगराध्यक्षांनीही लाच घेऊन, पद आणि प्रतिष्ठेला काळिमा फासला आहे.

 

नगराध्यक्ष बाईंनी एका कामाच्या मोबदल्यात ठेकेदाराकडे लाच मागिल्याचा आरोप आहे. याच लाचेची रक्कम स्वीकारताना प्रतिभा शिंदे आणि त्यांच्या पतीला अटक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *