Thu. Sep 19th, 2019

खवय्यांसाठी खास ‘सतरंगी थाळी’!

0Shares

सध्या विविध प्रकारच्या थाळींची क्रेझ खवय्यांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी ‘बाहुबली थाळी’, ‘महिष्मती थाळी’, ‘पेशवाई थाळी’ यांसारख्या विविध थाळी प्रसिद्धी पावल्या आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचीदेखील एक थाळी सध्या लोकप्रिय होत आहे. ही थाळी म्हणजे ‘सतरंगी थाळी’!

काय आहे सतरंगी थाळी’?

दिल्लीतील ‘मेलो गार्डन’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ‘सतरंगी थाळी’ मिळते.

ही थाळी इतकी भरगच्च असते, की या थाळीत सर्व पदार्थ मांडले थाळीचं वजन 25 किलो होतं.

यातील थाळीचा आकारही षटकोनी असतो.

या थाळीतील मेन्यूही वेगवेगळे असतात.

चार प्रकारच्या सतरंगी थाळी या ठिकाणी मिळतात.

4 प्रकारच्या सतरंगी थाळी!

Veg सतरंगी पंजाबी

Non- Veg सतरंगी पंजाबी

Veg चिंजाबी (चायनीज +पंजाबी)

Non-Veg चिंजाबी

काय असतं सतरंगी थाळी?

पोळ्या/ पुऱ्या/ भाकरी,

कोशिंबिरी

भाज्या

उसळी

चटण्या

विविध sweet dishes

कुरकुरे दही कबाब

अमृतसरी आलू

पंजाबी कढाई कुंभ

पिंडवाला शाही पनीर

गोभी मटर अद्रकी

थाळीला मतदानाचा रंग, ‘चौकीदार पराठा’ आणि ‘इलेक्शन थाळी’ खमंग!

तसंच non-veg मध्ये ‘तंदुरी चिली चिकन’सारखे पदार्थ या थाळीत मिळतात.

तसंच ताक, लस्सी यांसारख्या पेयांचाही समावेश या थाळीत असतो.

या थाळीतील पदार्थ एवढ्या प्रमाणावर असतात, की एक थाळी 4 जणांना पुरते. तरीही ही थाळी ‘unlimited’ असते. म्हणजेच आपल्याला हवे असणारे पदार्थ आपण कितीही वेळा पुन्हा मागवू शकतात. या एका थाळीची किंमत व्हेज असल्यास रु. 1600 आणि नॉनव्हेज असल्यास रु. 2000 पर्यंत असते.

पुण्यामध्ये गाजतेय उन्हाळा स्पेशल ‘Ice Cream थाळी’!

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *