Tue. Sep 28th, 2021

दहशतवादाच्या आरोपावरून सौदी अरेबियात 37 जणांचा शीरच्छेद!

दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांवरून सौदी अरेबियामध्ये 37 नागरिकांची थेट मुंडकीच उडवण्यात आली. रियाध, मक्का, मदीना, कासिम आणि पूर्वेकडील भागांमध्ये या शिक्षेची अमलबजावणी झाल्याचं सागंण्यात येत आहे.

सौदी अरेबिया देशातील कठोर कायदे आणि त्यांची कडक अमलबजावणी ही कायमच जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. गुन्हेगारांना अमानुष शिक्षा देण्याची प्रथा सौदी अरेबियामध्ये अजूनही अस्तित्वात आहे.  मोहम्मद बिन सलमान यांनी प्रिंस बनल्यावर काही सामाजिक बदल झाले आहेत. मात्र अजूनही सौदी अरब येथे राजकीय पक्ष स्थापन करायला परवानगी नाही. आत्तापर्यंत अनेक आंदोलक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे.

दोन भारतीयांचाही यापूर्वी शीरच्छेद!

काही दिवसांपूर्वीच दोन भारतीयांनाही अशाच प्रकारे मृत्यूची शिक्षा देण्यात आली होती.

हे दोघेही मूळचे पंजाबचे रहिवासी होते.

त्यांतील एकाचं नाव सतविंदर कुमार असून तो होशियारपूर येथील होता, तर दुसऱ्याचं नाव हरजीत सिंग असून तो लुढियाना येथील होता.

दोघांचीही 28 फेब्रुवारी रोजी शीर कलम करण्यात आली होती.

मानव हक्क कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

सौदी अरेबियाच्या कायद्यात स्थानिक आणि परदेशी असा भेदभाव केला जात नाही. तेथील नियमांचं पालन हे सर्वांनाच करावं लागतं. लोकशाही नसल्यामुळे तेथील राजसत्तेने ठरवलेल्या शिक्षाच देण्यात येतात. त्यामुळेच आपल्या देशातील 1-2 नव्हे, तर 37 नागरिकांचा दहशतवादाच्या आरोपावरून शीरच्छेद करण्यात आलाय.

या घटनेविरोधात जगभरातील मानव हक्क कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मात्र सौदी अरेबियाच्या नियमांपुढे त्यांचं अजूनही काही चालत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *