Jaimaharashtra news

सावित्रीबाई फुले यांची आज जयंती

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ला साताऱ्यातील नायगाव येथे झाला. भारतीय स्त्रियांवर सावित्रीबाईंच्या कार्याचा सर्वाधिक पगडा असून त्यामुळेच महिला वर्ग आजच्या दिवशी त्यांना नमन करत असतो. प्रत्येक क्षेत्रात काम करणारी आजची महिला ही सावित्रीबाईंच्या खंबीर योगदानामुळेच उभी आहे. भारतात खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंनीच स्त्रीवादाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

पुण्यात आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गंज पेठेतल्या फुले वाड्यात येऊन अभिवादन केलं आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या वाड्याचा आणखी विकास झाला पाहिजे तो येणाऱ्या काळात आम्ही करू,असं आश्वासन यावेळी मुंडे यांनी दिलं आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा महाविकास आघाडी सरकारनं निर्णय घेतला आहे.

Exit mobile version