Wed. Oct 5th, 2022

अपोलो एसबीआय कार्ड लाॅंंच, ग्राहकांना मिळणार हे फायदे…

भारतात आता आरोग्य व वेलनेस क्षेत्रातील को बॅण्डेड क्रेडिट कार्ड लाँच झाले आहे. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी करत स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अपोलो हॉस्पीटल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलेच को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड लाँच केले आहे.

लोकांनाही परवडण्या जोग्या आरोग्य सेवांच्या मागणीसह आरोग्याची बाजारपेठ वाढत आहे. कुटूंबाच्या आरोग्य संदर्भातील संपूर्ण प्रवासातील सर्व गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अपोलो एसबीआय कार्ड हे ग्राहकांना आरोग्य आणि वेलनेसच्या क्षेत्रातील परवडणारे असे पहिले उत्पादन आहे.

अपोलोच्या आरोग्य सेवा परिसंस्थेतील सर्व संबंधित घटकांच्या माध्यमातून अपोलो एसबीआय कार्ड कुटूंबातील आरोग्य सेवेच्या दृष्टीने सर्व गरजांची सर्व समावेशकरित्या पूर्तता करणार आहे.

अपोलो एसबीआय कार्डची वैशिष्टे:

 • अपोलो क्रेंद्रांमध्ये 100 रूपयांच्या खर्चावर 3 रिवॉर्ड पॉइंटस
 • तसेच जेवण, मनोरंजन आणि चित्रपटाच्या तिकिटांवर 100 रूपये खर्च केल्यास 2 रिवॉर्ड पॉइंटस
 • कुठल्याही अपोलो आरोग्य क्रेंद्राच्या पॉइंट ऑफ सेलवर तात्काळ रिवॉर्ड पॉइंटस वापरण्याची सोय
 • अपोलो गिफ्ट व्हाउचर्ससाठी रिवार्ड पॉइंटसचा वापर करणे शक्य
 • अपोलो परिसंस्थेत रिवॉर्ड पॉइंटसचे हेल्थ क्रेडिटमध्ये रूपांतर
 • तसेच आरोग्य, निदानसेवा, औषध खर्च, फिजिओथेरपी इत्यादीवर डिस्काउंट्स
 • बचतीचे संधी देणारे वनअपोलो सदस्यत्व मोफत
 • लाभ आणि डिस्काउंट्स सर्व सहभागी अपोलो व्यावसायिक केंद्रावर उपलब्ध
 • सर्व पेट्रोल पंपावर इंधन अधिभारातून सवलत
 • दुसऱ्या वर्षापासून वार्षिक खर्च 90,000 किंवा अधिक झाल्यास नूतनीकरणाचे शुल्क माफ
 • 500 रूपयांच्या खर्चावर 500 रिवॉर्ड पॉइंट्सचा स्वागत लाभ

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.