Fri. Sep 17th, 2021

पुतळ्यांवर केलेला खर्च परत करा; SC चा मायावतींना दणका

सर्वोच्च न्यायालयाने बसपा अध्यक्षा मायावती यांना जोरदार दणका दिला आहे. मायावती मुख्यमंत्रीपदी असताना उभारलेल्या स्मारकांवर आणि पुतळ्यांवर झालेला खर्च परत करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. 2009 साली दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी यावर आदेश दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी होणार असून मायावती यांच्या वकिलांनी पुढील सुनावणी मे महिन्यात व्हावी अशी विनंतीही केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती नाकारली आहे.

पुतळे उभारण्यासाठी जनतेचा पैसा खर्च होत असल्याची जनहित याचिका 2009 साली दाखल करण्यात आली होती. 10 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. बसपा अध्यक्षांनी पुतळ्यांवर केलेला खर्च परत करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये बसपाची सत्ता असताना राज्यातील अनेक शहरांत त्यांच्या पक्षाचं चिन्ह असलेल्या हत्ती आणि स्वत:चे (मायावती) पुतळे उभारले होते. तसेच कांशीराम आणि बाबा साहेब आंबेडकरांचे काही पुतळे उभारण्यात आले होते. मायावतींच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांनी विरोधही केला होता.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *