Sat. Oct 16th, 2021

‘केजरीवाल सरकारने ऑक्सिजनची मागणी फुगवली’

दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या ऑक्सिजन पुरवठा पडताळणी अहवालामध्ये मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दिल्लीमध्ये ऑक्सिजन पुरवठा आणि वापर यामध्ये मोठा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. दिल्ली सरकारने गरजेपेक्षा चार पट अधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा ऑक्सिजन ऑडिट कमिटीने केला आहे.

दिल्ली सरकारने १४०० मेट्रीक टन ऑक्सिजन वापरण्यात आल्याचा दावा केला असला, तरी ही आकडेवारी प्रत्यक्षात वापरण्यात आलेल्या ऑक्सिजनच्या चौपट असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

दिल्लीतील चार रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचं म्हटलं आहे. या रुग्णालयांमध्ये खूप कमी प्रमाणात बेड असूनही अधिक ऑक्सिजन वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला. हा आकडेवारीवरुन दिल्लीमध्ये ऑक्सिजन वापराची चुकीची माहिती दिल्याचं अहवालात म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *