Tue. Sep 28th, 2021

शालेय बस शुल्कवाढीचे ओझे पालकांच्या पाठीवर?

येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2019-2020 पासून पालकांना शैक्षणिक शुल्का बरोबरच शालेय बसच्या वाढीव शुल्काचे ओझे वाहावे लागणार आहे. आधीच पालकांना वार्षिक शुल्कात झालेली वाढ ही परवाडणारी नव्हती, तरीही मुलांच्या भवितव्याचा विचार करता निमूटपणे हे शुल्क भरले गेले. ते पाहता आता बसच्या शुल्कात केलेली वाढ अधिक अन्यायकारक आहे. या शालेय वाहतुकीसाठी आकारण्यात  येणा-या शुल्कामध्ये तब्बल 10 ते 15 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. यासाठी साधारण 300 रूपयांचे वेगळे शुल्क आकारले जाईल, अशी माहिती बसमालक संघटनेने दिली आहे.

शुल्क वाढीचे नेमके कारण?

शालेय बस चालक, कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन, पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये झालेली वाढ

विम्याच्या हप्त्यांमध्ये झालेली वाढ या सगळ्याचा  बोझा हा पालकांच्या पाठी लादला जाणार आहे.

शालेय बसला टोल माफ व्हावा, यासाठी तगादा लावूनही त्याचा निर्णय लागलेला नाही,

टोलचे पैसे भरण्यासाठीची टांगती तलवारही पालकांच्या डोक्यावर आहे.

जूनपर्यंत टोल माफ न झाल्यास त्याचेही पैसे हे पालकांच्या खिशातून आकारले जाऊ शकतात,

ही शालेय बसच्या शुल्कात  होणारी  ही 10 ते 15 टक्के  वाढ पालकांना परवडणारी नाही.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *