Jaimaharashtra news

धक्कादायक! स्कूलबसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर

स्कूलबसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सांताक्रूझमधील पोदार शाळेच्या बसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर करण्यात येत होता.

गेल्या 3 दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. एका अपघातानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

 

या प्रकरणी खार पोलिसांनी स्कूलबसच्या चालकाला ताब्यात घेतले. मात्र त्याची जामीनावर सुटका झाली.

खारमधील एका व्यावसायिकाच्या कारला पोदार शाळेच्या बसने धडक दिली. त्यावेळी व्यावसायिकाने बसचा पाठलाग केला.

यानंतर त्याला बसच्या गियरऐवजी बांबू वापरला जात असल्याचे दिसून आले. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर खार पोलिसांनी बस चालक राज कुमारला ताब्यात घेतले. गियर बॉक्समध्ये 3 दिवसांपूर्वी बिघाड झाले. मात्र दुरुस्तीसाठी वेळ मिळत नसल्याने बांबूचा वापर केल्याचे राज कुमारने पोलिसांना सांगितले.

यानंतर त्याच्यावर कलम 279 आणि कलम 336 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

बसचालक राज कुमारचा परवाना उत्तर प्रदेशातील असल्याचे तपासातून समोर आले आहे.

पोलिसांनी या घटनेची माहिती पोदार शाळा प्रशासनाला कळवली आहे.

 

Exit mobile version