Sat. Sep 21st, 2019

छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीची आ.त्मह’त्या

0Shares

टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून बीड जिल्ह्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री 10.30 वाजता तिचा मृत्यू झाला. स्वाती घोळवे असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

स्वाती ही गप्पेवाडी येथील मामाच्या गावी शिक्षणासाठी आली होती.

ती शिंदी येथील बुवासाहेब पाटील माध्यमिक विद्यालयात 10 वी च्या वर्गात होती.

काही दिवसांपूर्वी गावातील अशोक रामदास केदार या 19 वर्षीय टवाळखोराने शाळेत तिची छेड काढली होती.

हा प्रकार तिने आपल्या मामाला सांगितल्यानंतर मामा आश्रुबा केदार यांनी गावात बैठक बोलून सर्वांसमोर त्या मुलाला समजावून सांगितले होते.

पुन्हा असा प्रकार करु नये म्हणून मामाने त्या मुलाच्या घरीदेखील तक्रार केली होती.

मात्र त्यानंतर चार दिवसांनी 25 जुलै रोजी आरोपी आशोक रामदास केदार याने पुन्हा शाळेत जावून स्वातीची छेड काढली.

शाळेत तिची बदनामी केली.

यानंतर 4 वाजता स्वाती मामाच्या शेतातील घरी आली आणि तिने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ती घरात पडलेली पाहून लहान मुलीने आरडा ओरड केल्यानंतर तिला उपचारासाठी तत्काळ आंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोमवारी 29 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता स्वातीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात आश्रुबा केदार यांच्या फिर्यादीवरुन आरोपी आशोक रामदास केदार याच्या विरुद्ध कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आशोक हा फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या भावासह आईला ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचा पुढील तपास पो. ना.सुनिल बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *