शाळेतील मुलींची भर रस्त्यात हाणामारी

बंगळुरूमधील प्रतिष्ठित बिशप कॉटन शाळेच्या विद्यार्थिनींचा मारामारी करण्याचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. शाळेच्या गणवेशात असलेल्या या शाळकरी मुली एकमेकींवर तुटून पडल्या आहे. भर रस्त्यात ही हाणामारी झाल्याने तिथे मोठी गर्दी जमली होती. या व्हिडिओत शाळकरी मुली एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी हिंसकपणे एकमेकांचे केस ओढताना, दुसऱ्या विद्यार्थिनींला काठी मारताना दिसत आहेत. इतर काही विद्यार्थी मध्यस्थी करण्याचा आणि हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करत होते. व्हिडिओमध्ये एका मुलीला दुखापत झालेलीही दिसते.योगेश नावाच्या मुलामुळे मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडून कळाली आहे.
भर रसत्यात सुरु असलेली ही हाणामारी बराच काळ सुरु होती. व्हिडिओत मुलींचा जोरजोरात आरडाओरडा सुरु असल्याचंही ऐकायला येत आहे. रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या काही लोकांनी मध्यस्थी करत मारामारी सोडवण्याचा प्रयत्नही केला. हा सर्व प्रकार अज्ञाताने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि त्यानंतर हाणामारीचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान, बिशप कॉन्व्हेंट स्कूलकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पाहा हा व्हिडिओ..