Wed. Dec 1st, 2021

इथे ‘ज्ञान-एक्सप्रेस’ निघतेय शिक्षणयात्रा, जीवनाची गाडी नक्की येणार रुळावर!

सद्यस्थितीत जीर्ण झालेल्या शाळांबद्दल आपण नेहमी ऐकत आलोय. मात्र अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या मेळघाट परिसरात रेल्वेची शाळा बनली आहे. विद्यार्थी देखील याच रेल्वेच्या डब्यांमध्ये बसून आपला शिक्षणाचा प्रवास करत आहेत.

अमरावती जिल्यातील मेळघाट परिसरातील गौरखेड्याची जिल्हा परिषदेची शाळा ही महाराष्ट्रातल्या इतर शाळांप्रमाणेच आहे.

गौरखेडा शाळेचीसुद्धा दयनीय अवस्था झाली होती, मात्र शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी एकमेकांच्या मदतीने गोष्टीतला जपानी प्रयोग राबविला आणि शाळेची अनोख्या पद्धतीने  रंगरंगोटी करून रूपच पालटलं. त्यामुळे केवळ शाळेच्या बाह्यरूपातच फरक पडला नाही, तर पटसंख्या आणि गुणवत्तेतही बदल झाला. शाळेची रंगरंगोटी करताना चक्क तिचं रूपांतर ज्ञान एक्सप्रेसमध्ये केलं गेलं.

झुकझुक करत शिक्षणयात्रेला निघालेल्या या प्रवाश्यांना यामध्ये लांबचा प्रवास गाठायचा आहे.

विद्यार्थीदेखील मोठ्या उत्साहाने या एक्सप्रेसमध्ये सहभागी होऊन शिक्षण घेतात.

डिजिटल स्कूलप्रमाणे येथे एक कॉम्प्युटर रूम तयार करण्यात आली आहे.

या संबंधीचं सर्व शिक्षण देखील विद्यार्थी घेतात.

रेल्वेच्या डब्यासारखी रंगरंगोटी केल्याने विध्यार्थी देखील नियमित शाळेत येतात.सोबतच क्रीडा क्षेत्रात देखील उत्साह वाढला आहे.

मेळघाटसारख्या अति दुर्गम भागात या शाळेला महत्व आलंय.

इतर शाळांनीदेखील नवनवीन उपक्रम राबविल्यास जिल्हा परिषदेसारख्या शाळांमध्ये पटसंख्या वाढू शकते, असा विश्वास येथील मुख्याध्यापकांना आहे

शिक्षणाचा मार्ग चुकला तर आयुष्याची गाडी रुळावरून घसरते. मात्र या ज्ञान एक्सप्रेसमधून शिक्षण प्रवासाला निघालेले हे विद्यार्थी इच्छित स्टेशनला नक्कीच पोहचतील. शिक्षणातून ज्ञानाकडे सुरू असलेल्या या प्रवासाला ‘जय महाराष्ट्र’च्या शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *