आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट

कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे आजपासून पुन्हा राज्यातील शाळ सुरू झाल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा धोका कमी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईत आजपासून स्थानिक स्तरावर प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. नाशिकमध्येही आजापासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. तर पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय एक आढवडा पुढे ढकलण्यात आला. तसेच नागपूरमध्ये २६ जानेवारीनंतर शाळा सुरू होणार आहेत.
आजपासून राज्यात शाळेची घंटा वाजली आहे. नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या आणि खाजगी शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
अमरावतीत शाळा बंदच
सोमवारपासून राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत मात्र अमरावतीमध्ये शाळा सुरू झाल्या नाहीत. अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २८ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.