आजपासून पुणे जिल्हयातील काही शाळा सुरू
आजपासून सर्व खबरदारी घेऊन ग्रामीण भागातील काही शाळा सुरू झाल्या आहेत.

कोरोना प्रादुर्भावामुळे पुण्यासह राज्यातील अनेक शाळा बंद होत्या पण स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणची परिस्थिती पाहुन शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा असं सरकारकडून सांगण्यात आल आहे. पुणे शहरात १३ डिसेंबरपर्यत शाळा बंदच राहणार आहेत. तर पिंपरी चिंचवड मधील शाळा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
मात्र पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात शाळा उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून सर्व खबरदारी घेऊन ग्रामीण भागातील काही शाळा सुरू झाल्या आहेत.