Sat. Jun 12th, 2021

धक्कादायक! क्राईम शो पाहून शाळकरी विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या!

इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षिकेची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडी शिवाजीनगर परिसरात घडलीय. चोरीच्या उद्देशातून या लहान मुलाने ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्याने क्राईम टीव्ही शो मालिका बघून हत्येची योजना बनवली असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झालंय. आयशा अस्लम हुसैया असं हत्या झालेल्या शिक्षिकेचे नाव असून ती 30 वर्षांची होती. गोवंडी शिवाजीनगर येथील प्लॉट नंबर 26 येथे ही शिक्षिका एकटीच राहात होती.

काय घडलं नेमकं?

आयशा ही विवाहित असून तिला एक 7 वर्षांचा मुलगा आहे.

तिचा पती हा मुलासह तिच्यापासून विभक्त राहतो.

आयशा घराशेजारीच असलेल्या सुफी इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षिका होती.

तसंच घरात खासगी शिकवणी चालवत होती.

12 वर्षांचा संशयित आरोपी आयशाच्या घरापासून काही अंतरावरच राहतो.

तो गेल्या काही वर्षांपासून आयशाकडे शिकवणीसाठी येत असे.

तसंच आयशा त्याला घरातील कामं सांगत असे.

अनेक वेळा त्याने तिला पर्समधून पैसे काढताना बघितलं होतं.

आधी आईने पैसे मागितल्याचा बहाणा करून शिक्षिकेकडे पैसे मागू लागला. मात्र आयशाने पैसे देण्यास नकार दिला.

त्यानंतर मुलाने क्राईम शो वरून प्रेरणा घेत शिक्षिकेची हत्या केली. मंगळवारी या मुलाला अटक करण्यात आली आणि अल्पवयीन असल्याने डोंगरीच्या बालसुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *