Wed. Dec 8th, 2021

आता पाचवी आणि आठवीचे विद्यार्थीही होणार नापास!

आत्तापर्यंत पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात येत नव्हतं. केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यामुळे पास होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या वर्गात ढकलले जाई. मात्र यापुढे तसं होणार नाही.

आता परीक्षांना गांभीर्याने घ्यावंच लागेल

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना सक्तीने पास केलं जातं.

त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून या परीक्षा फारशा गांभीर्याने घेतल्या जात नव्हत्या.

मात्र त्याचा त्रास विशेषतः शिक्षकांना होत असे.

परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं मूल्यमापन व्यवस्थित करता येणं गरजेचं आहे.

आठवीपर्यंत परीक्षाच होत नसल्याने मुलांचा लिहिण्याचा सराव होत नाही.

त्याचा परिणाम थेट दहावीचे पेपर लिहिताना होतो आणि त्यामुळे असे विद्यार्थी पास होऊ शकत नाहीत.

या सर्वांची दखल घेत केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायद्यामध्ये सुधारणा केली आहे.

त्यामुळे आता अशा विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकललं जाणार नाही.

 

पुनर्परीक्षेची संधी

मात्र अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी मिळणार आहे.

निकालानंतर पुनर्परीक्षा घेतली जाईल.

जर या परीक्षेत पास झाले, तर विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकतील.

त्यांचं वर्ष वाया जाणार नाही.

मात्र जर ते पास होऊ सकले नाही, तर त्यांना वरच्या वर्गात ढकललं जाणार नाही.

त्यांना पुन्हा आहे त्या इयत्तेतच राहवं लागेल.

1 मार्चपासून हा निर्णय देशभारतील शाळांमध्ये लागू झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *