Tue. Sep 28th, 2021

शाळेच्या अनुदानासाठी शिक्षकांचा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या!

दहा दिवसांपासून विनाअनुदानित शाळेतील शिक्षक उपोषणाला बसले होते मात्र आज थेट या शिक्षकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. शाळेला अनुदान देण्याची मागणी शिक्षकांची आहे मात्र या शिक्षकांकडे आयुक्त दुर्लक्ष करत आहेत तर दुसरीकडे मात्र आयुक्तांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये नाराजी आहे

भविष्यातील चांगली पिढी घडवणारे शिक्षक सध्या स्वतःच्याच न्यायहक्कासाठी आंदोलन करत आहेत…गेल्या दहा दिवसापासून विनाअनुदानित शाळेतील शिक्षक आजाद मैदानावर उपोषणाला बसले होते मात्र दहा दिवस होऊनही त्यांची दखल न घेतल्यामुळे या शिक्षकांनी आक्रमकपणे आज आयुक्तांचे दालन गाठले आणि आयुक्तांच्या दालनासमोर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र तरीही महापालिका प्रशासनाला जाग आली नाही.

यापूर्वी शिक्षकांच्या याच मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची देखील बैठक झाली होती.

मात्र गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा ठराव एकमताने मंजूर केल्या नंतरही महापालिका आयुक्त अजॉय मेहता मात्र या शाळांना अनुदान देण्यास नकार देत आहेत.

तर दुसरीकडे महापौरांनी ठराव मंजूर करूनही आयुक्त आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत

मुंबईत एकूण 104 विना अनुदानित शाळा आहेत.

यापैकी 63 शाळा या 2000 साला पूर्वीच्या आहेत.

शासनाच्या अध्यादेशानुसार या 63 शाळांना अनुदान देणं गरजेचं असूनही महापालिका प्रशासन अनुदान देण्यास नकार देत आहे.

एकीकडे महापालिकेकडून नवीन नवीन कोट्यावधीचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत.

मात्र या शिक्षकांना देण्यासाठी निधी नसल्याचं महापालिका सांगत आहेत.

63 शाळेतील एकून 450 शिक्षक आहेत.

या शिक्षकांना जर या वर्षीपासून अनुदान सुरु केले तर त्यांच्या वेतनाचा 18 कोटी आणि इतर अनुदान 28 कोटी म्हणजे केवळ 46 कोटींचा अतिरिक्त भार हा महापालिकेवर येणार आहे.

मात्र असं असूनही महापालिका आयुक्त आपला मनमानी कारभार करत असून हट्टी भूमिका घेत असल्याचा आरोप आता होतो.

आयुक्त 450 कोटींचा सायकल ट्रक तयार करतात.

मात्र शिक्षकांना पैसे देत नाही अशी नाराजी शिवसेनेमध्ये असल्याचं चित्र आहे

त्यामुळे एकीकडे महापालिका आयुक्त आपल्या निर्णयावर ठाम आहेत तर दुसरीकडे मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये याबाबत ना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *