Sun. Sep 19th, 2021

School Bus च्या चालकांचं ‘असं’ वर्तन, नागरिक संतप्त!

नागपूर मध्ये स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या चालकाला नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. व्हॅनची तोडफोड केली. संतप्त नागरिकांनी चालकाचं टक्कल केलं. एवढंच नव्हे तर त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास इमामवाड्यातील इंदिरानगर भागात घडली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे. आशिष मनोहर वर्मा असं अटकेतील चालकाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

पीडित विद्यार्थिनी दुसऱ्या तर तिचा भाऊ सातव्या वर्गात शिकतो.

आशिष वर्मा याच्या व्हॅनने दोघेही शाळेत ये-जा करतात.

नेहमीप्रमाणे दुपारी तो अन्य विद्यार्थ्यांसह दोघांना घरी सोडण्यासाठी जात होता.

इंदिरानगर भागात व्हॅनमध्ये विद्यार्थिनी आणि तिचा भाऊ होता.

त्याने विद्यार्थ्याला पैसे देऊन कुरकुरे आणायला पाठवले.

तो कुरकुरे आणण्यासाठी जाताच आशिष वर्माने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली.

हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणीने बघितला.

तिने आरडा-ओरड केली. नागरिकांनी धाव घेतली.

नागरिकांनी आशिष वर्माला व्हॅनबाहेर काढून चांगलाच चोप दिला.

त्याचं टक्कल केलं. व्हॅनची तोडफोड केली. या घटनेने प्रचंड संतापलेले नागरिक आशिषला जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी आरोपीला अटक करून घटनेचा तपास सुरु केले.

जेव्हा आरोपीला जमावाकडून मारहाण सुरु होती नागरिकांच्या तावडीतून पोलिसांनी आशिषची सुटका केली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. पोलीस तेथे पोहचले नसते तर जमावाने आरोपीची हत्या केली असती. मात्र या घटनेनंतर पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. खरंच school bus मध्ये आपलं पाल्य सुरक्षित असतात का, असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *