Sun. Oct 17th, 2021

अनेळखी मुलाची चिठ्ठी, खजिल विद्यार्थिनीची आत्महत्या!

शाळेत अनोळखी मुलाने चिठ्ठी दिल्याचा प्रयत्न केल्यामुळे खजिल झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना पंढरपूर येथील वखारी आश्रमशाळेत घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या काजल पोरे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. या मुलीने घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काजलला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मुलीच्या वडिलांसह वाखरी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पोलिसांकडे गर्दी केली. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत अज्ञात इसमाविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा- Youtube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या!

काय घडलं नेमकं?

वखारी येथील माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात काजल पोरे शिकत होती.

ती दहावीमध्ये होती.

दोन दिवसांपूर्वी शाळेत असताना तिला एका अज्ञात मुलाने लहान मुलाच्या हातून चिट्ठी देण्याचा प्रयत्न केला होता.

ही घटना शाळेतील शिक्षकांनी पाहिल्यावर त्यांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली.

तसंच काजलच्या पालकांना सकाळी शाळेत बोलावून याची कल्पना दिली.

शाळा सुटल्यावर काजल घरी आली.

दुपारी वडील जेवण करून कामावर निघून गेले.

तेव्हापासून तिने स्वतःला घरीच एका खोलीत बंद करून घेतलं.

बराच वेळ ती बाहेर न आल्याने तिच्या मोठ्या बहिणीला भीती वाटू लागली.

मोठ्या बहिणीने तातडीने वडिलांना बोलावून घेतले.

काजलने दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडावा लागला.

तेव्हा काजलने ओढणीला गळफास घेतल्याचे दिसले.

वडिलांनी तातडीने तिला ग्रामस्थांच्या मदतीने दवाखान्यात हलवले.

मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा- कबुतराच्या अंड्यांचं ऑम्लेट आणि आत्महत्या… ‘ही’ आहे खरी कहाणी!

हे ही वाचा- आत्महत्यांचं गाव! – बोथबोडण

गुन्हा दाखल केल्यावरच अंत्यसंस्कार

या घटनेनंतर वाखरीत ग्रामस्थांनी काजोलच्या कुटुंबियांसमवेत पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सर्व प्रकाराची माहिती घेतल्यावर रात्री उशिरा अज्ञात विद्यार्थ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतरच काजलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढू लागल्यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकाची या परिसरात करडी नजर होती. मात्र तरीही मुलाने काजलला चिठ्ठी दिली. हा अपमान सहन न झाल्याने काजलने जीवन संपवलं.

आता काजलच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रोडरोमिओंचा तपास पोलीस करत आहेत.

यापुढे अशा घटनेतून दुसऱ्या कोणत्याही मुलीला जीव गमवावा लागणार नाही याची खबरदारी शाळा , समाज आणि पोलिसांना घ्यावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *