राज्यभरातील शाळा सुरु

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा पण आजपासून सुरु झाल्या आहेत. शाळा जरी १३ जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना १५ जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटलं होतं.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होतं. कोरोना आणि त्यानंतर टाळेबंदी याचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आजपासून राज्यातल्या शाळा सुरु होत आहेत.
शाळेत जातान पळावे लागणारे नियम
- विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना, शाळेत असताना आणि बाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे.
- तसंच विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये एक लहान सॅनेटाईझरची बाटली असणं आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी कोणाच्याही संपर्कात आल्यानंतर किंवा कुठे स्पर्श केल्यानंतर सात हात सॅनेटाईझ करत राहणं आवश्यक आहे.
- तसंच डबा खाताना आणि डबा खाऊन झाल्यानंतरही हात सॅनेटाईझ करत राहणं आवश्यक आहे.
- शाळेतुन वर्गात विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं महत्त्वाचं आहे.
- तसंच मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांचे कपडे सॅनेटाईझ करून धुवायला टाकणे हेही महत्वाचं आहे.