Thu. Sep 29th, 2022

मुंबईतील शाळा, महाविद्यालये २ मार्चपासून सुरू होणार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मुंबई महानगर पालिकेने शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येत्या २ मार्चपासून मुंबईतील शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. यासंबंधी मुंबईपालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

मुंबई पालिकेकडून सादर करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा, मैदानी खेळ आणि शैक्षणिक उपक्रमांसह पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात  आली आहे. येत्या २ मार्चपासून मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात याव्यात.

मुंबईतील शाळा पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार असून विद्यार्थ्यांना शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. तर मैदानी खेळ, कवायती करताना मास्क बंधनकारक नसेल. विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांच्या तापमानाची नोंद घ्यावी. तर शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. तसेच मैदानी खेळ, कवायती, शैक्षणिक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त करणे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.