१ डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार

शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यात यावे याबाबत प्रस्ताव मांडला होता. तसेच राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे आता पहिली ते चौथीचे वर्ग ऑफलाईन सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.
येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे. मात्र लसीकरणाशिवाय शाळा सुरू न करण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्ष विद्यालयाचे दार विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे टपटप्प्याने शाळा सुरू करण्यात आली. सुरूवातीला पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. आणि आता पहिली ते चौथीच्या वर्ग सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे.