शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि रिपु सुदन कुंद्रा यांना सेबीने दोषी ठरवले

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि रिपु सुदन कुंद्रा यांना इन्सायडर ट्रेडिंग नियमावलीचे उल्लंघन आणि माहिती दडवल्याप्रकरणी सेबीने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी सेबीने या तिघांना बुधवारी ३ लाख रुपयांचा दंड ठोठवला आहे.
सेबीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राशी संबंधित विआन इंडस्ट्रीज या कंपनीबाबत कारवाई केली आहे. तिघांनी इन्सायडर ट्रेडिंग नियमावलीचे उल्लंघन केल्याचे तपासात उघड झाले आहे. सेबीने सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१५ या काळात तपास केला. यावेळी इन्सायडर ट्रेडिंगचे नियमावलीचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
सेबीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर प्रिवेंशन ऑफ इन्साइडर ट्रेडिंग नियम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्याच्यावर प्रिफरेंशयल अलॉटमेंटबाबत माहिती देण्यात उशीर झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. नियमांनुसार शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना व्यवहारानंतर दोन ट्रेडिंग दिवसात खुलासा करणे आवश्यक होते. परंतु मे २०१९ मध्ये हा खुलासा करण्यात आला.