Sat. Jun 19th, 2021

मुंबईकरांसाठी नवी लाईफलाईन! मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोनोरेलच्या कोनशिलेचे अनावरण झाले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान धावणाऱ्या मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवून दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे आज मोनोरेलचा हा भारतातील पहिला प्रयोग सुरू झाला असल्याचे मत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले.

एकात्मिक तिकिट प्रणाली तयार करण्यात येत असून यामुळे मुंबईत एकाच तिकिटावर सार्वजनिक वाहतूक सुविधेद्वारे प्रवास करता येणार असल्याची माहिती  रेल्वे सुविधांच्या  उद्घाटनावेळी दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात होत आहे, हा क्षण मुंबईसाठी खूपच आनंदाचा आहे.

जो प्रकल्प  बनता बनता इतिहासजमा झाला होता. त्या प्रकल्पाचं उद्घाटन आम्ही करू शकलो याचा आनंद आहे.

संपूर्ण 19 किमी धावणारी मोनोरेल ही खऱ्या अर्थाने लोकोपयोगी झाली आहे.

या मोनोतून दर महिन्याला सुमारे 30 लाख नागरिक प्रवास करतील.

केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या एमयूटीपी 3  मुळेही वाहतूकीचे चित्र बदलणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे 250 किमीचे जाळे पसरविण्याचे काम सुरू असून एका तासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे सुलभ होणार आहे.

मुंबईतील उपनगरीय रेल्वेवरील भार कमी करण्यासाठी मोनोरेल, मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बस या सार्वजनिक वाहतूक सुविधांचे एकत्रिकरण करणे आवश्यक आहे.

मुंबईत लवकरच वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करण्यात येणार मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वे, बस यांच्याबरोबर जलवाहतुकीचेही एकत्रिकरण तिकीट सिस्टीम आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

यासाठी एकात्मिक तिकिट प्रणाली तयार करण्यात येत असून यामुळे  मुंबईत एकाच तिकिटावर सार्वजनिक वाहतूक सुविधेद्वारे प्रवास करता येणार आहे .

मेट्रो, मोनो व जल वाहतूक सुविधेमुळे एकात्मिक सार्वजनिक वाहतूक सुविधा असलेले  मुंबई हे देशातील पहिले शहर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यानी व्यक्त केला आहे.

मोनोरेलला 30 टक्के वीज ही स्टेशनवर बसविलेल्या सोलर पॅनेलमधून मिळणार आहे.त्यामुळे वीज बचत होणार असल्याचेही  मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मोनोरेलची वैशिष्ट्ये –

मोनोरेल एकूण 19.54 किमी चा संपूर्ण पल्ला गाठणार

जपानच्या ओसाका मोनोरेल (23.8 किमी) नंतर मुंबई मोनोरेल ही जगातील दुसरी सर्वात लांब मोनोरेल ठरणार.

मोनोरेलचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा 11.28 किमीचा दुसरा टप्पा पूर्ण

–मोनोरेलमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, प्रवासी चालक संपर्क यंत्रणा

मोनोरेलमधील रि-जनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणामुळे तब्बल 25 टक्के विजेची बचत होणार

मोनोरेलचा चेंबूर ते वडाळा 8.26 किमी चा पहिला टप्पाकार्यरत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *