Tue. Jul 27th, 2021

काश्मीर मध्ये कलम 144 लागू, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुब्बा मुफ्ती नजरकैदेत

जम्मू कश्मीरमध्ये जमावबंदी लागू केली असून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुब्बा मुफ्ती तसेच सज्जाद लोन यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सोमवारी शाळा आणि कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहे.

जम्मू कश्मीरमध्ये जमावबंदी लागू केली असून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुब्बा मुफ्ती तसेच सज्जाद लोन यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सोमवारी शाळा आणि कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहे. कलम 35 ए किंवा 370 वर मोठा निर्णय होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेला तणाव कायम आहे. त्याचमुळे या ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

काश्मीर मध्ये कलम 144 लागू

जम्मू काश्मीरमध्ये 144 कलम लागू करण्याचा निर्णय झाला असून पोलीस, राखीव पोलीस दल यांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभुमीवर तेथील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. तर लँडलाईन सेवाही बंद करण्यात आली आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून हे कलम लागू करण्यात आले आहे.

या पार्श्वभमीवर जम्मु काश्मीरचे राज्यपाल मलिक यांनी पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांची मध्यरात्री घेतली. या बैठकीत डीजीपी, मुख्य सचिव, आयजी यांच्यासह इतर अधिकारी हजर होते. जम्मू काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारची सभा, रॅली किंवा जिथे जमाव एकत्र येईल अशा सगळ्या कृतींवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणूनचं 10 ऑगस्ट पर्यंत शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जम्मु काश्मीर मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रातही सरकार पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. सकाळी 9.30 वाजता मोदी सरकारची कॅबिनेट बैठक होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता खासदारांना मोदी संबोधित करतील. भाजप खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला गेला आहे.

या जमावबंदीमुळे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुब्बा मुफ्ती तसेच सज्जाद लोन यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. कलम 35 ए आणि 370 विषयीचा मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. यामुळे हे कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *