Wed. May 19th, 2021

शाहीनबाग परिसरात कलम 144 लागू

सौजन्य - PTI

गेल्या अडीच महिन्यांपासून शाहीनबाग येथे ज्या परिसरात CAA विरोधात आंदोलन सुरू आहे, तेथे आता जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलंय. या परिसरात त्यामुळे कुणीही एकत्र येऊन आंदोलन करू नये, असं पोलिसांनी नोटिस लावून बजावलं आहे. जमावबंदी धुडकावून लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही पोलीसांनी बजावलं आहे.

15 डिसेंबर 2019 पासून नवी दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात CAA विरोधात आंदोलन सुरू आहे. या परिसरातील रस्त्यांवर आंदोलक गेल्या अडीच महिन्यांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्तेही बंद आहे. ‘हे आंदोलन रविवारी चिरडून टाकू’ असा धमकीवजा इशारा हिंदू सेनेने Tweeter वर दिला होता. 1 मार्च रोजी शाहीनबाग येथील आंदोलन संपवून टाकू, असं Tweet मध्ये म्हटलं होतं. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील (Citizenship Amendment Act) विरोधात आंदोलन करणाऱ्यांना हटवण्यात दिल्ली पोलीसांना अपयश आलंय. त्यामुळे आपणच पुढाकार घेऊन 1 मार्च रोजी शाहीनबागेतील सर्व आंदोलकांना हटवू’, असं हिंदू सेनेचा नेता विष्णू गुप्ता याने Tweet मध्ये म्हटलं होतं. तसंच या ट्विटमध्ये अनेक लोकांनाही आमंत्रित करून सर्व राष्ट्रभक्तांनी मिळून शाहीनबागेतील आंदोलकांना हटवण्याच्या कामात सहभागी व्हावं, असं आवाहनही केलं.

यामुळेच पोलिसांचं मोठं पथक शाहीनबाग परिसरात दाखल झालं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ओढावू नये, म्हणून शाहीनबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त केला गेला आहे. या परिसरात पोलिसांनी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे येथे आता आंदोलनाला परवानगी नाही. अशा परिस्थितीत आंदोलकांनी यापुढे हे आंदोलन थांबवावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *