Sun. Oct 24th, 2021

संमतीने ठेवलेले समलैंगिक संबध हा गुन्हा नाही – सर्वाेच्च न्यायालय

कलम 377 अवैध असून समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे भारतात दोन समवयस्क लोकांमधील लैंगिक संबंध गुन्हा ठरणार नसून न्यायालयाच्या या निर्णयामुळे समलैंगिक समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे.

कलम 377 नुसार दोन समलिंगी व्यक्तींमधील संबंधाना गुन्हा मानण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना वैध ठरवत हा कायदा रद्द ठरवला आहे. हा कायदा तर्कहीन आणि मनमानी करणारा असल्याचं कोर्टाने म्हंटलं आहे.

समलैंगिकांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. समलिंगी संबंध हा गुन्हा नाही. लोकांनी आपली मानसिकता बदलावी, असंही कोर्टाने म्हंटलं आहे.

कोर्टानं नेमकं काय म्हटलंय ते वाचा-

  • समलैंगिकता हा गुन्हा नाही
  • समलैंगिक व्यक्तींना इतराप्रमाणे अधिकार
  • केवळ घटनात्मक नैतिकता महत्वाची
  • समाजाच्या नैतिकतेच्या आधारावर कायदा नाही
  • समलैंगिक लोकांनाही मूलभूत हक्क मिळवण्याचा अधिकार
  • लैंगिक प्राधान्य ही नैसर्गीक बाब
  • लैंगिक प्राधान्याला गुन्हा ठरवणं, हे मूलभूत अधिकारांचं हनन
  • प्रत्येकाच्या अधिकाराचा सन्मान करणं आवश्यक
  • समाजात प्रत्येकाला आपली स्वतंत्र ओळख जपण्याचा अधिकार
  • जुनी विचारधारा बदलण्याची ही वेळ

‘कलम 377’च्या वैधतेबाबत ऐतिहासिक सुनावणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *