Mon. Dec 6th, 2021

JNU Attack:हा हल्ला पाहून मला २६/११ दहशतवादी हल्ला आठवला – मुख्यमंत्री

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काल ५ जानेवारीला विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अज्ञात हल्लेखोरांनी जेएनएसयूच्या अध्यक्षेला निर्घूणपणे मारहाण केली.

घटनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच या हल्ल्याप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

जेएनयू हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

या हल्लेखोरांना तोंड झाकून येण्याची काय गरज होती. हे घाबरट होते. अशा घाबरटपणाचे कधीच समर्थन होणार नाही.

राज्यात असे प्रकार सहन केले जाणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील विद्यार्थी सुरक्षित आहेत. त्यांनी काळजी करु नये, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

जेएनयुत झालेल्या हल्ल्याचे पडसाद देशभरात पाहायला मिळाले. गेटवे ऑफ इंडियावर विद्यार्थी संघटनेकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

अधिक वाचा : JNUattack : विद्यार्थ्यांसोबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही ठिय्या

आज सकाळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सामील झाले होते. तसेच पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *