Thu. Jul 18th, 2019

राम मंदिरासाठी भाजपालाच निवडून द्या – सुब्रमण्यम स्वामी

237Shares

आधुनिक भारतासाठी प्राचीन संस्कृतीचा सन्मान करणं आवश्यक आहे. अन्यथा कितीही विकास केला तरी देश पुन्हा परक्यांचा गुलाम होऊ शकतो.

असं स्पष्ट प्रतिपादन डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे केलं आहे.

भारत विकास परिषद आयोजित “आधुनिक भारताची परिकल्पना, भविष्यातील मार्ग” या विषयावर ते चेंबूर येथे बोलत होते.

डॉ. स्वामी यावेळी म्हणाले की, या देशात संस्कृत आणि देवनागरी लिपी अनिवार्य केली पाहिजे.

प्रत्येक भाषेत संस्कृत शब्दच अधिक आहेत. देशातील पाठ्यपुस्तकात देशाचा अभिमानास्पद इतिहास व संस्कृतीच्या ऐवजी मुघल आणि इंग्रजांचे उदात्तीकरण शिकवले जाते.

त्यामुळे ही पुस्तकेही लवकरात लवकर बदलली पाहिजेत असेही डॉ. स्वामी यांनी म्हटलं आहे.

आज जग भारतीय संस्कृती स्वीकारते आहे, पण योगाला ख्रिश्चन योगा म्हटले जाते, हे मात्र थांबले पाहिजे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर्नल या नासाच्या जर्नल मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संस्कृत सर्वाधिक उपयुक्त भाषा आहे.

त्यामुळे देशात संस्कृत सर्वांना शिकवले पाहिजे असे ते म्हणाले. श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे काम सुरू करण्यासाठी कोर्टाच्या परवानगीची गरज नाही असे ते म्हणाले.

या जागी पूर्वी मंदिरच होते हे सर्वांनी मान्य केलेलेच आहे, असे सांगून स्वामी पुढे म्हणाले की या जागेचे नरसिंह राव यांनीच राष्ट्रीयीकरण केलेले आहे.

आता या जागेवर कोर्टाचा काहीही अधिकार चालत नाही. केवळ मूळ जमीन मालकाला किती भरपाई द्यायची हाच निर्णय कोर्ट देऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे.

राम मंदिरासाठी पुन्हा भाजपाला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

237Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *